Flight Urination Case esakal
देश

Flight Urination Case : विमानात पुन्हा मूत्रविसर्जन! एकाने दुसऱ्या प्रवाशावर का केली लघुशंका?

सकाळ डिजिटल टीम

New York-Delhi Flight : उडत्या विमानात मूत्रविसर्जन करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. अमेरिकेहून भारतात येत असलेल्या एका फ्लाईटमध्ये सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे.

दारुच्या नशेत एका प्रवाशाने दुसऱ्यावर मूत्रविसर्जन केलं. दोघांमध्ये कुठल्यातरी कारणाने तू-तू, मैं-मैं झाल्याची माहिती आहे. दिल्लीतल्या इंदिरा गांधी एअरपोर्टवर फ्लाईटने लँड करताच दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाईटने भारताकडे उड्डाण केलं होतं. या विमानात रविवारी घटना घडली आहे. सदरील प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतलं आहे. एका वृत्तानुसार दारुड्या प्रवाशावर कारदेशीर कारवाई होणार आहे.

सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने सांगितलं की, पीडित प्रवाशाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीदेखील उडत्या विमानात लघुशंका केल्याचे प्रकार घडलेले आहेत. मागच्या महिन्यात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर लघुशंका केली होती.

रविवारी हे विमान दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यानंतर दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं. एअरलाईन्सने ही माहिती इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. आरोपीने पीडित प्रवाशाची माफी मागितली. त्यानंतर पीडित प्रवाशाने त्याच्यावरोधात तक्रार केली नाही. आरोपीने रेपुटेशन खराब होऊ नये म्हणून पीडिताकडे याचना केली होती.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा एअर इंडियाच्या विमानात असाच प्रकार घडला होता. एका दारुड्या प्रवाशाने महिला प्रवाशावर लघुशंका केली होती. शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाला नंतर अटक करण्यात आली. त्या प्रकरणी कोर्टात सुनावण्यादेखील झाल्या. त्यानंतर त्या जामीन मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT