Flipkart CEO Binny Bansal resigns over serious personal misconduct
Flipkart CEO Binny Bansal resigns over serious personal misconduct 
देश

फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: फ्लिपकार्ट या मातब्बर ई-कॉमर्स कंपनीचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. वॉलमार्टने एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे. फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने बन्सल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बन्सल यांच्याविरोधातील चौकशीत त्यांच्यावरील आरोपांची खातरजमा झालेली नाही. मात्र त्याचबरोबर तपासात काही त्रूटी राहिल्या आहेत.  त्याचबरोबर बन्सल यांनी या प्रकरणात आपली बाजू कशा पद्धतीने मांडली याबाबतही पारदर्शकतेचा अभाव असल्याचे वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बन्सल यांचा राजीनामा लगेचच स्वीकारण्यात आला आहे. बिन्नी बन्सल फ्लिपकार्टच्या स्थापनेपासून त्यातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत. मात्र आरोपांमुळे बन्सल यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांनी स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी केली आहे. बन्सल यांनी आरोपांचे खंडन केले आहे. 

चौकशीत बन्सल यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही. बन्सल यांच्यानंतर कल्याण कृष्णमूर्ती आता फ्लिपकार्टच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. यात मिंत्रा आणि जबोंग या कंपन्यांचासुद्धा समावेश आहे. या दोन्हीही फ्लिपकार्टच्याच उपकंपन्या आहेत. अनंत महादेवन हे मिंत्रा आणि जबोंग या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT