lalu prasad yadav
lalu prasad yadav 
देश

शिक्षेविरोधात लालूंची उच्च न्यायालयात धाव

पीटीआय

रांची - चारा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात लवकरच झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या वकिलाने आज दिली.

चारा गैरव्यवहारप्रकरणी यादव यांना "सीबीआय'च्या न्यायालयाने साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. "सीबीआय' न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याचे यादव यांचे वकील प्रभातकुमार यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले. शुक्रवारी किंवा पुढील सोमवारी अपिलासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यादव यांच्या बहिणीचे रविवारी (ता. 7) निधन झाले असून, त्या पार्श्वभूमीवर यादव हे पॅरोलसाठी अर्ज करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी प्रभातकुमार यांना विचारला होता. त्यावर अशा प्रकारचा कुठलाही विचार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. 

चारा गैरव्यवहारप्रकरणी यादव यांना यापूर्वीही न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT