pune sakal
देश

‘माकप’च्या कार्यालयांत पहिल्यांदाच तिरंगा फडकणार

‘माकप’चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी १५ ऑगस्ट रोजी पक्ष कार्यालयांत तिरंगा फडकविण्याची घोषणा केली.

सकाळ वृतसेवा

कोलकता - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील कार्यालयात यंदा स्वातंत्र्यदिनी प्रथमच पक्षाच्या झेंड्याऐवजी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील एकेजी भवन येथे झालेल्या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीन दिवसांच्या बैठकीचा समारोप काल झाला. त्यानंतर ‘माकप’चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी १५ ऑगस्ट रोजी पक्ष कार्यालयांत तिरंगा फडकविण्याची घोषणा केली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Politics News)

स्‍वातंत्र्यसंग्रामात समाजवाद्यांच्या योगदानाची माहिती देण्यासाठी एक मोहीमही सुरू करणार आहे. सत्तरीच्या दशकाच्या मध्यात पश्‍चिम बंगालमध्ये ‘माकप’च्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी स्वातंत्र्यदिनी कोणत्याही शासकीय किंवा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय झेंडावंदन करण्याचे टाळले होते. मात्र यावर सर्व थरांतून टीका झाल्यानंतर रायटर्स बिल्डिंगसमोर होणाऱ्या सरकारी झेंडावंदन कार्यक्रमात १९८२ पासून तिरंगा फडकाविण्यास सुरुवात केली.

डाव्यांचे अस्तित्व पुसले

भारताच्या स्वातंत्र्यदिनी डावे पक्ष त्यांच्या कार्यालयांमधील कार्यक्रमात केवळ पक्षाचा लाल रंगाच्या झेंडा फडकवितात. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर डाव्यांच्या कार्यालयांमध्ये या दिवशी एका वेगळ्या खांबावर तिरंगाही फडकविला जातो. लोकसभा व विधिमंडळात बंगालमधील डाव्या आघाडीचा एकही सदस्य नसल्याचे चित्र स्वातंत्र्यानंतर यावेळी प्रथमच दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT