
'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्मिता जयकर सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. स्मिता यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात कलाकारांच्या आईची भूमिका साकारली. 'हम दिल दे चुके सनम' मध्ये त्या ऐश्वर्या रायच्या आई होत्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राबद्दल भाष्य केलंय. २५ वर्षांपूर्वी ती जेव्हा अभिनेत्री बनायला आली होती. तेव्हा ती कशी दिसत होती याबद्दल त्यांनी सांगितलंय. सोबतच कुणालाही त्याच्या दिसण्यावरून जज करू नये असंही त्या म्हणाल्यात.