forest fire triggers several landmine explosions along loc in poonch  
देश

जम्मू काश्मीर : LOC जवळील जंगलात लागलेल्या आगीत भूसुरुंगांचा स्फोट

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील (Line of Control) जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक भूसुरुंगांचा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. सोमवारी नियंत्रण रेषेजवळील जंगलातील आग मेंढर सेक्टरमधील भारतीय सीमेपर्यंत पसरली होती. या आगीमुळे, सुमारे अर्धा डझन भूसुरुंगांचा स्फोट झाला, ज्या घुसखोरी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपयांचा (Anti-infiltration obstacle system) हे भूसुरुंग भाग होते.

वनपाल कनार हुसेन शाह यांनी सांगितले की, 'गेल्या तीन दिवसांपासून जंगलात आग लागली आहे. आम्ही लष्करासह ते विझवण्याचा प्रयत्न करत आहोत. आग आटोक्यात आणण्यात आली मात्र आज सकाळी ती दरमशाल ब्लॉकमध्ये सुरू झाली आणि जोरदार वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली. नंतर ती सीमावर्ती गावाजवळ आल्यानंतर ती आटोक्यात आली, असे ते म्हणाले. बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजौरी जिल्ह्यातील सीमेजवळील सुंदरबंदी भागात आग लागली आणि ती इतर वनक्षेत्रातही पसरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT