MP Crime News esakal
देश

धक्कादायक! भाजप नेत्यासह आख्या कुटुंबानं प्राशन केलं विष; चौघांचा मृत्यू, खोलीत सापडला महत्वाचा..

पोलिसांना खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनमोल आणि सार्थक यांचा मृत्यू झाला तर संजीव आणि त्यांची पत्नी श्वास घेत होते.

MP Crime News : विदिशातील बंटी नगर भागात राहणारे भाजपचे (BJP) माजी नगरसेवक संजीव मिश्रा (Sanjeev Mishra) यांनी गुरुवारी सायंकाळी पत्नी आणि दोन मुलांसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

मुलांच्या आजारानं संजीव त्रस्त झाले होते. पोलिसांना खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्यांनी आजारपणाचा उल्लेख करत आत्महत्या केल्याचं लिहिलंय.

संजीव यांचा पुतण्या अभिषेकनं सांगितलं की, गुरुवारी संध्याकाळी काका संजीव आणि त्यांचे कुटुंबीय बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्यामुळं आम्ही त्याच्या मित्रांना आणि पोलिसांना (Police) बोलावलं. पोलिस येताच खोलीचा दरवाजा तोडला असता संजीव, त्याची पत्नी नीलम, मुलं अनमोल (13 वर्षे) आणि सार्थक (6 वर्षे) हे खोलीत जमिनीवर पडलेले आढळले.

MP Crime News

अनमोल आणि सार्थक यांचा मृत्यू झाला तर संजीव आणि त्यांची पत्नी श्वास घेत होते. दोघांनाही तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान संजीव यांचा मृत्यू झाला.

पत्नी नीलमला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं, तिथं तिचाही काही वेळानं मृत्यू झाला. सीएसपी विकास पांडे यांनी सांगितलं की, खोलीतून विषाचा बॉक्स आणि एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये मुलांच्या आजारामुळं आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे. संजीव यांचा मोठा मुलगा अनमोल गेल्या आठ वर्षांपासून मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजारानं त्रस्त होता, त्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT