Former Governor of Jammu and Kashmir Satyapal Malik allegations of corruption Two FIR
Former Governor of Jammu and Kashmir Satyapal Malik allegations of corruption Two FIR Satyapal Malik
देश

मलिक यांच्या आरोपांबाबत दोन एफआयआर...

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दोन प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आज नोंदविले. या प्रकरणी सीबीआयने जम्मू, श्रीनगर, दिल्ली, मुंबई, नोएडा, तिरुअनंतपुरम, दरभंगा येथील १४ ठिकाणी छापे घातले. सीबीआयने रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि ट्रिनिटी री इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले. जम्मू-काश्‍मीरच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना मलिक यांनी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी मंजूर केली होती. यावरून वाद झाला होता.

याच्याशी संबंधित प्रकरणात हा एफआयआर दाखल करण्यात आला. रिलायन्स जनरल इन्शुरन्सशी करार करताना सरकारी निकषांमध्ये बदल करण्यात आले. ऑनलाइन टेंडर मागविले नाही, संबंधित कंपनीला यापूर्वी राज्यात काम केल्याचा अनुभव असण्याची अत्यावश्‍यक अटही बदलण्यात आली. तसेच संबंधित कंपनीची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचीही अट बदलण्यात आली. या करारावर वादंग झाल्यानंतर ही योजना रद्दबातल करण्यात आली.

या योजनेनुसार सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना व त्यांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना सहा लाख रुपयांचे विम्याचे कवच मिळणार होते. यासाठी राज्य कर्मचाऱ्यांना ८,७७७ रुपये तर निवृत्तिवेतन धारकांना २२, २२९ रुपये हप्ता भरावा लागणार होता. दुसरा एफआयआर किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कामाबद्दल दाखल करण्यात आला. या प्रकल्पाचे काम देताना ई-टेंडरची प्राथमिक अटही पाळण्यात आली नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणी चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टचे माजी अध्यक्ष नवीनकुमार चौधरी, माजी व्यवस्थापकीय संचालक एम. एस. बाबू, ए. के. मित्तल आणि अरुणकुमार मिश्रा आणि पटेल इंजिनिअरिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला. ‘राज्य सरकारच्या कामांशी संबंधित दोन प्रकरणांना मंजुरी देण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती,’ असा आरोप मलिक यांनी केला होता.

चिनाब प्रोजेक्टच्या पदाधिकाऱ्यांवर छापे

नवीनकुमार चौधरी हे राज्यसरकारमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे प्रधान सचिवही होते. त्यांच्या घरही सीबीआयने छापा घातला. चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या घरीही छापे घालण्यात आले. पहिल्या एफआयआर हा विमा योजनेतील ६० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित, तर दुसरा एफआयआर हा किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टच्या विविध कामांतील २२०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT