Former Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan women supporters got emotional watch video eSakal
देश

शिवराज सिंह चौहानांचे मुख्यमंत्रीपद गेल्याने महिला समर्थक भावूक; 'मामां'समोर रडतानाचा Video आला समोर

महिला समर्थकांच्या आश्रूंनी ओलावली विदाई; 'मामा'च्या भावनिक बोलण्याची प्रतिक्रिया

रोहित कणसे

मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षानेमोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री केले आहे. ते शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा होताच शिवराज सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे.मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या काही महिला भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी त्यांच्या महिला समर्थकांची भेट घेतली. यावेळी या महिला समर्थकांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. . दुसरीकडे शिवराज सिंह चौहान यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाला, मी काहीही नसतानाही मुलींची लग्ने लावायचो. पण मी मुख्यमंत्री होताच लाडली बेटी आणि कन्या विवाह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मी माझ्या मुली आणि बहिणींचे जीवनात सुधार आणू शकलो.

माजी मुख्यमंत्री म्हणाले की, बाबू लाल गौर यांच्यानंतर मी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. 2008 आणि 2013 मध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले. 2018 मध्ये जागा कमी होत्या पण मते जास्त होती. माझे मन आनंदाने आणि समाधानाने भरलेले आहे. पीएम मोदी, केंद्राची योजना आणि लाडली बहना योजना यामुळेच सरकार स्थापन झाल्याचे देखील शिवराज सिंह चौहान म्हणाले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT