pranab mukharjee
pranab mukharjee 
देश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं होतं. आता त्यांच्या प्रृकृती संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानतंर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 

प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरवरून कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. तसंच आठवड्याभरात संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला विलगीकरण करुन घ्यावे तसेच आपली चाचणी करुन घ्यावी, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केला होता. काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले 84 वर्षीय प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कार्यकाळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून देशातील रुग्णाची संख्या 22 लाखांच्या वर पोहोचली आहे. देशातील अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचंही याआधी समोर आलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्जुन मेघवाल यांचाही समावेश आहे. तसंच देशातील अनेक राज्यातील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT