देश

चार दिवस झाले; भाजपची वेबसाईट अद्यापही बंदच; डेटाबेस हॅक? 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपची ही वेबसाईट 5 मार्च रोजी सकाळी हॅक झाली होती. त्यानंतर 'काम चालू आहे; थोड्याच वेळात पुन्हा ऑनलाईन येऊ' असा संदेश साईटवर झळकत होता. भाजपच्या कार्यकर्त्यांची माहिती असलेला 'डेटाबेस' आणि पक्षाच्या देणगीदारांचे तपशीलही हॅकर्सने ताब्यात घेतले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ही वेबसाईट अद्याप पूर्ववत होऊ शकलेली नाही, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

याआधी दोन आठवड्यांपूर्वी गुजरात भाजपचे उपाध्यक्ष आय. के. जडेजा यांची वेबसाईटही हॅक करण्यात आली होती. हॅक करून त्या वेबसाईटवर 'पाकिस्तान झिंदाबाद'चे संदेश प्रसिद्ध करण्यात आले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संरक्षण मंत्रालयासह इतरही काही विभागांची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT