Four Terrorists Killed  Sakal
देश

कुलगाममध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

रात्री उशिरापर्यंत दोन्ही ठिकाणच्या चकमकी सुरू होत्या

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकींत चार दहशतवादी ठार झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही ठिकाणच्या चकमकी सुरू होत्या. चकमकीत मारला गेलेला एक दहशतवादी लष्करे तैयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता.

दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. शौकत अहमद शेख या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी नुकतीच अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षादलांनी उत्तर काश्‍मीरमधील लोलब भागात शोधमोहीम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याचा जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यात एक दहशतवादी मारला गेला. त्यावेळी आणखी दोन ते तीन दहशतवादी तेथे लपून बसले होते. त्यांच्याबरोबरील चकमक दीर्घकाळ सुरू होती. नंतर त्यापैकी आणखी एक दहशतवादी मारला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत कुलगाम जिल्ह्यातीलच दमहाल हांजीपोरा येथे चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. यापैकी एक दहशतवादी लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी तर दुसरा जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता, अशी माहिती जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. हॅरिस शरीफ आणि झाकिर पड्डेर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT