देश

राफेल करार हा दोन सरकारमधला करार : फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : बहुचर्चित राफेल करार हा सरकार ते सरकार म्हणजेच त्यावेळेसच्या दोन सरकारमध्येच झाला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 लढाऊ विमान खरेदीवरून जेव्हा करार झाला, तेव्हा आपण सत्तेत नव्हतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राफेल खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. या करारावरून सध्या मोदी सरकारवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मॅक्रॉन म्हणाले, की, मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो, ती म्हणजे हा राफेल करार म्हणजे सरकार ते सरकार यांच्यात झालेली चर्चा आहे. मला यावर अधिक बोलायचे नाही. कारण मी त्या वेळी पदावर नव्हतो; परंतु करार कोणताही असो; त्याबाबतचे फ्रान्सचे नियम स्पष्ट आहेत, हे ठाऊक आहे. राफेल करार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण हा करार केवळ औद्योगिक संबंध प्रस्थापित करत नाही, तर सामरिक आघाडीचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मोदी सरकारने फ्रान्सची कंपनी डेसॉल्टकडून राफेल विमान खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. त्याचे मूल्य तत्कालीन यूपीए सरकारने ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याचा दावा राहुल गांधी आणि काँग्रेसकडून गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. या व्यवहारामुळे सरकारी खजिन्यातील हजारो कोटी रूपयांचे नुकसान करुन जाणीवपूर्वक काही हेतू सांभाळण्यासाठी मोदींनी व्यवहारात बदल करत हे कंत्राट रिलायंसला दिले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही काँग्रेसकडून मोदी सरकारवर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT