Research of Mangeshkar Hospital Benefits of Ayurvedic Medicine after Corona pune  sakal
देश

आयुर्वेदिक आहारावर आता कडक निर्बंध; केंद्राचा मोठा निर्णय

कोरोना प्रादुर्भावानंतर आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली आयुर्वेदिक आहाराच्या विक्रीत वाढ झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आयुष मंत्रालयाच्या आय़ुर्वेदिक आहार गटातल्या उत्पादनांसाठीची नियमावली जारी केली आहे. त्यामुळे आता आयुर्वेदिक आहार विक्रेता आणि निर्मात्यांना आय़ुर्वेदिक औषधं या गटात विक्री करता येणार नाही. त्यासाठी खाद्य सुरक्षा विभागाक़डून परवाना घेणं आवश्यक असेल. नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

आय़ुर्वेदिक आहार या गटातल्या उत्पादनांची निर्मिती आणि वितरण अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम, २०२२ च्या नियमांनुसार केली जाईल आणि FSSAI च्या परवानगीनंतरच विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होईल. आयुर्वेद आहार श्रेणीसाठी एक वेगळा लोगोसुद्धा तयार करण्यात आला आहे. यामुळे या प्रकारातल्या उत्पादनांना ओळखणं सोपं होईल आणि त्यांचा दर्जा योग्य राखण्यातही फायदा होईल.

त्याचबरोबर आयुर्वेदाच्या अधिकृत पुस्तकांमध्ये लिहिलेल्या पाककृतीनुसार तयार करण्यात आलेल्या पदार्थांनाच मान्यता दिली जाणार आहे. आयुर्वेदिक आहाराच्या अनेक पदार्थांमध्ये खाद्य सुरक्षा मानकांचं पालन सध्या केलं जात नाही. कोरोना महामारीनंतर देशात अनेक ठिकाणी आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली आयुर्वेदिक आहार उत्पादनांची विक्री विनापरवाना होत होती. यामध्ये देशी, विदेशी अशा हजारो कंपन्या आयुर्वेदिक उत्पादनं तयार करत होत्या. त्यामुळे बाजारात आयुर्वेदिक आहार उत्पादनांचं प्रमाण वाढलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Rare Vulture Sighting:लखाडमध्ये ‘जीपीएस’सह दुर्मिळ गिधाडाचे दर्शन; पेंच संरक्षण केंद्राशी नाळ जोडली!

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

SCROLL FOR NEXT