देश

इंधनदरवाढीचा भडका कायम 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 34 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली. केंद्र सरकारने मागील आठवड्यात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर अडीच रुपये कपात केली होती. यानंतर काही राज्यांनीही मूल्यवर्धित करात कपात केली होती. 

मात्र, सरकारी तेल कंपन्यांकडून सुरू असलेल्या दरवाढीने नागरिकांना काही प्रमाणात मिळालेल्या दिलाशावर पाणी फिरले आहे. पेट्रोलचा दर आज मुंबईत प्रतिलिटर 87.73 रुपये, दिल्लीत 82.26 रुपये, चेन्नई 85.50 रुपये आणि कोलकत्यात 84.09 रुपयांवर गेला. देशातील चार महानगरांमध्ये दिल्लीत पेट्रोल सर्वांत स्वस्त असून, मुंबईत ते सर्वात महाग आहे. डिझेलचा दर आज मुंबईत प्रतिलिटर 77.68 रुपये, दिल्लीत 74.11 रुपये, चेन्नईत 78.35 रुपये आणि कोलकत्यात 75.96 रुपयांवर पोचला. 

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ सुरू असून, आज तो प्रतिबॅरल 84 डॉलरवर पोचला. यातच डॉलरच्या तुलतेन रुपयातील घसरणीमुळे खनिज तेलाची आयात महाग आहे. यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात वाढ सुरू आहे. 

मुंबईतील दर (प्रतिलिटर रुपये) 
पेट्रोल : 87.73 
डिझेल : 77.68 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT