Nitin Gadkari  eSakal
देश

Nitin Gadkari : अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गडकरी नाराज; विरोधकांकडून पुन्हा टीका

‘द्वारका’ची पुरेशी माहिती ‘कॅग’ला दिली नाही; विरोधकांकडून पुन्हा टीका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘द्वारका एक्स्‍प्रेसवे’च्या बांधकामावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावर महालेखापरिक्षकांनी (कॅग) कठोर शब्दांत ताशेरे ओढल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे समजते.

‘कॅग’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांना काही अधिकाऱ्यांनी योग्य माहिती पुरविली नसल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारच्या काही प्रकल्पांवर ‘कॅग’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिल्ली व हरियाना राज्यांत उभारल्या जाणाऱ्या ‘द्वारका एक्स्‍प्रेसवे’च्या बांधकामाचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

या महामार्ग उभारणीची मूळ किंमत १८.२० कोटी प्रतिकिलोमीटर असताना प्रत्यक्षात या महामार्गाच्या बांधकामावर २५१ कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विरोधकांनी याच अहवालावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

बारा टक्के कमी दराने निविदा

गडकरी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. यात काही अधिकाऱ्यांनी ‘कॅग’ला योग्य माहिती पुरविली नसल्याचे त्यांनी नमूद केले. ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या या महामार्गाची मूळ किंमत ९१ हजार कोटी रुपये एवढी होती.

परंतु पुढे यात उड्डाण पूल, उन्नत मार्ग, अंडरपास, बोगदे व रिंग रोडचा समावेश झाला. ‘द्वारका एक्स्प्रेसवे’मध्ये झालेल्या या कामांचा मूळ प्रकल्पाच्या किमतीत समावेश नव्हता. मुळात या प्रकल्पाची निविदा १२ टक्के कमी दराने कंत्राटदाराला दिली आहे, असा दावाही मंत्रालयाने केला आहे.

...म्हणून गडकरी नाराज

‘द्वारका एक्स्प्रेसवे’च्या मूळ निविदांमध्ये मंजूर झालेली कामे व नंतर जोडण्यात आलेल्या अतिरिक्त कामांमुळे या प्रकल्पाच्या मूळ किमतीमध्ये वाढ झाली आहे. ही वस्तुस्थिती काही अधिकाऱ्यांनी ‘कॅग’समोर मांडलेली नाही याबद्दल नितीन गडकरी यांनी काही अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

‘कॅग’चा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना ‘कॅग’ने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले आहेत. गडकरी हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. त्यांना बाजूला करून त्यांचे राजकारण संपवायचे हेही एक कारण असू शकते.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT