Search   Gandhi family gave Vijay Mallya, Kingfisher Airlines a sweet deal BJP
Search Gandhi family gave Vijay Mallya, Kingfisher Airlines a sweet deal BJP 
देश

गांधी कुटुंबियांकडून विजय मल्ल्याला मदतीचा प्रयत्न : संबित पात्रा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोट्यवधींची कर्जे बुडवून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला गांधी कुटुंबियांकडून किंगफिशरची 'स्वीट डिल' देण्यात आली, असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज (गुरुवार) काँग्रेसवर केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा शेल (बनावट) कंपन्यांशी संबंध होता, असा आरोपही पात्रा यांनी केला.

संबित पात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. विजय मल्ल्याने लंडनमधून एक व्हिडिओ जारी केला होता. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटल्याचा दावा त्याने जारी केलेल्या व्हिडिओमधून केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून अरुण जेटली यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. या आरोपानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी पात्रा म्हणाले, मागील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने 'स्वीट डिल' केले होते. किंगफिशर एअरलाईन्स त्यापैकी एक आहे.

दरम्यान, संपूर्ण गांधी कुटुंबियांकडून विजय मल्ल्या आणि किंगफिशर एअरलाईन्सला मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. किंगफिशर एअरलाईन्स ही त्यातीलच एक स्वीट डिल आहे, असेही पात्रा म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT