देश

गणेश चतुर्थीला 'यूपी'ला हादरविण्याचा होता कट 

पीटीआय

कानपूर : गणेश चतुर्थीला हल्ल्याची योजना आखणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला आज उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

कमार-उझ-झामा (वय 37) असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो मूळचा आसामचा रहिवासी आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा तो सक्रिय सदस्यही आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली. त्याला कानपूरच्या चाकेरी भागात अटक करण्यात आली, असे सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

अटक केलेल्या दहशतवाद्याने गणेश चतुर्थीनिमित्त हल्ल्याची योजना आखली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे सिंह यांनी नमूद केले. एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की हा दहशतवादी सोशल मीडियावर सक्रिय होता आणि त्याने एप्रिल 2018मध्ये एके-47 शस्त्रासह स्वत:चे छायाचित्रही पोस्ट केले होते. त्यानंतरच त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राष्ट्रीय तपास संस्था आणि कानपूर पोलिसांच्या मदतीने दहशतवादविरोधी पथकाने ही अटकेची कारवाई केली. 

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण 

कानपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने 2017मध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते आणि त्यानंतर तेथेच तो हिज्बुलमध्ये सहभागी झाला होता. त्याशिवाय 2008 ते 2012 या कालावधीत तो परदेशात राहात होता. तो चांगला शिक्षित असून, संगणकाचेही चांगले ज्ञान आहे. मात्र, तो बीएच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेत नापास झाला होता, अशी माहिती पोलिस महासंचालक सिंह यांनी दिली. त्याची संपर्कयंत्रणा आणि अर्थपुरवठ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT