Garibrath Express  
देश

Garibrath Express : गरीबरथ एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचला लागली आग, प्रवाशांचा उडाला गोंधळ

Sandip Kapde

Garibrath Express News बिहार : सध्या बालासोर रेल्वे दुर्घटना लोकांच्या मनात ताजी आहे. दरम्यान, रेल्वेबाबत आणखी एक वाईट बातमी आली आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या समस्तीपूर-बरौनी रेल्वे सेक्शनवरील दलसिंहसराय नजीर गंज स्थानकादरम्यान आनंद विहारहून जयनगरकडे येणाऱ्या १२४३६ गरीब रथ एक्स्प्रेसच्या जी-३ बोगीत अचानक आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला.

कोच अटेंडेंटने साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि त्यानंतर जी-3 बोगी ट्रेनपासून वेगळी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोकही घटनास्थळी पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच समस्तीपूर रेल्वे विभागाचे डीआरएम आलोक अग्रवालही टीमसोबत घटनास्थळी पोहोचले.

या घटनेमुळे रेल्वेच्या बोगीतून प्रवास करणाऱ्या लोकांच्या गर्दीत एकच गोंधळ उडाला. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की शॉर्ट सर्किटमुळे ट्रेनला आग लागली. या संपूर्ण प्रकरणाची रेल्वे अधिकारी चौकशी करत आहेत. (Railway News)

Railway

समस्तीपूरचे डीआरएम आलोक अग्रवाल म्हणाले, "कोणतीही हानी झालेली नाही. आग आटोक्यात आली आहे. लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलवण्यात आले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT