Gautam Adani richest person
Gautam Adani richest person  Gautam Adani richest person
देश

Hurun Global Rich List : गौतम अदानी कमाईत Number 1

सकाळ डिजिटल टीम

आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी २०२१ मध्ये संपत्तीत ४९ अब्ज डॉलरची वाढ केली आहे. गौतम अदानी यांची ही कमाई २०२१ मधील जगातील टॉप तीन अब्जाधीश एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या एकूण कमाईपेक्षा जास्त आहे. २०२२ एम 3 एम हुरुन ग्लोबल रिच लिस्टने (Hurun Global Rich List) बुधवारी याची माहिती दिली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश (Mukesh Ambani) अंबानी यूएसडी १०३ अब्ज संपत्तीसह सर्वांत श्रीमंत भारतीय राहिले आहेत. पोर्ट-टू-एनर्जी समूह अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर असताना त्यांची संपत्ती १५२३ टक्क्यांनी वाढून ८१ अब्ज डॉलर झाली आहे. १० वर्षांत अंबानींच्या संपत्तीत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानींच्या संपत्तीत १,८३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुसरीकडे एचसीएलचे शिव नाडर यूएसडी २८ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला (२६ अब्ज डॉलर) आणि स्टील मॅग्नेट लक्ष्मी एन मित्तल (२५ बिलियन डॉलर) सह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी (Gautam Adani) एम 3 एम हुरुन ग्लोबल लिस्ट २०२२ मधील सर्वांत फायदेशीर व्यवसायी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी संपत्तीमध्ये ४९ अब्ज डॉलर जोडले, असे एम 3 एम हुरुन ग्लोबल रिच लिस्टने निवेदनात म्हटले आहे.

३,३८१ अब्जाधीशांची यादी

इलॉन मस्क (Elon Musk), जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यासारख्या तीन जागतिक अब्जाधीशांपेक्षा त्याच्या एकूण संपत्तीत झालेली वाढ खूपच जास्त आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये २० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. २०२२ एम 3 एम हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये ६९ देशांतील २,५५७ कंपन्या आणि ३,३८१ अब्जाधीशांची यादी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT