Bharat Biotech Covaxin esakal
देश

भारतीयांना मोठा दिलासा! जर्मनीनं 'भारत बायोटेक'च्या लसीला दिली मान्यता

सकाळ डिजिटल टीम

भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनसाठी एक चांगली बातमी समोर आलीय.

भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोना लस, कोवॅक्सीनसाठी (Covaxin) एक चांगली बातमी समोर आलीय, जी भारतात तयार झालीय. जर्मनीनं (Germany) कोवॅक्सीनला मान्यता दिलीय. या मंजुरीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यामुळं जर्मनीत जाणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, पूर्वीप्रमाणं 1 जूनपासून भारतीयांना प्रवासापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination Certificate) देण्याची आवश्यकता नाहीय. विशेषत: प्रवासाच्या दृष्टीनं ही मान्यता देण्यात आलीय.

यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोवॅक्सिनच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती. याबाबत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, भारत बायोटेकनं संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीद्वारे निर्मित COVID-19 कोवॅक्सीनचा पुरवठा थांबवला आहे. उत्पादन सुविधांची तपासणी आणि सुधारणा करताना आढळून आलेले दोष दुरुस्त करता यावेत, यासाठी हे निर्बंध लादण्यात आले होते.

डब्ल्यूएचओच्या निर्णयानुसार, लस प्राप्त करणार्‍या देशांना योग्य कारवाई करण्यास सांगितलं होतं. परंतु, काय कारवाई केली जाईल हे सांगितलं नाही. डब्ल्यूएचओनं सांगितलं की, ही लस प्रभावी आहे आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही चिंता नाही. परंतु, निलंबनामुळं कोवॅक्सीनच्या पुरवठ्यात व्यत्यय येईल. 14 ते 22 मार्च दरम्यान डब्ल्यूएचओ पोस्ट इमर्जन्सी यूज लिस्टिंग (EUL) तपासणीच्या निकालांना प्रतिसाद म्हणून हे निलंबन घेण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT