Glenmark nasal spray 
देश

'ग्लेनमार्क फार्मा' करणार कोविड प्रतिबंधक 'नेझल स्प्रे'चं उत्पादन

या नेझल स्प्रेच्या फेज-३ च्या क्लिनिकल ट्रायल्स सध्या सुरु आहेत

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मुंबईस्थित ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स (Glenmark Farma) ही कंपनी नाकातून देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक औषधाची (anticovid drugs) निर्मिती करणार आहे. कॅनेडिअन बायोटेक कंपनी सॅनोटाईझ रिसर्च आणि डेव्हलपमेंट कॉर्प (SaNOtize Research and Development Corp) या कंपनीच्या सहकार्यानं नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रेचं उत्पादन करण्यात येणार आहे. CDSCOच्या तज्ज्ञांच्या समितीकडून या नेझल स्प्रेच्या फेज-३ च्या क्लिनिकल ट्रायल्स सध्या सुरु आहेत.

फेज-३च्या क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्यानंतर हा नेझल स्प्रे 'फॅबिस्प्रे' नावानं सप्टेंबरनंतर बाजारात दाखल होणार आहे. भारताबरोबरच सिंगापूर, श्रीलंका, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम, नेपाळ, तैवान, ब्रुनैई, कंबोडिया, हाँगकाँग आणि तिमोर-लेत्से या देशांमध्येही हा अँटिकोविड नेझल स्प्रे उपलब्ध होणार आहे.

हे नेझल स्प्रे कोविडची विषाणूची निर्मिती आणि नाकपुड्यांमधून फुफ्फुसांपर्यंत होणारा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंध करण्यास सक्षम आहे. हा वापरण्यास साधा आणि सोपा नेझल स्प्रे असून तो नायट्रिक ऑक्सिईडपासून तयार केलेला आहे. नैसर्गिक नॅनो मॉलेक्युलमध्ये सूक्ष्म विषाणूविरोधी तत्व असल्याचं सिद्ध झालं आहे. याचा थेट परिणाम SARS-CoV-2 विषाणूवर होणार आहे. NONS चा अँटिकोविड नेझल स्प्रे पहिल्या चोवीस तासात कोविडचा व्हायरल लोड ९५ टक्क्यांपर्यंत कमी करतो. तर ७२ तासांत ९९ टक्के व्हायरल लोड कमी करतो. या औषधाची युके आणि कॅनडात ट्रायल्स सुरु आहेत.

ग्लेनमार्कच्या सहकार्यानं मोठ्या परिप्रेक्षात सोपी आणि स्वस्त औषध निर्मिती करण्यासाठी सॅनोटाईझ उत्साही आहे. सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात या औषधामुळं भविष्यातील कोरोनाची लाट थोपवण्यात मदत होणार आहे, असं सॅनोटाईझचे सहसंस्थापक आणि सीईओ डॉ. गिली रिव्हेज यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT