Arvind kejriwal Team eSakal
देश

Goa Election : ‘आप’चा १३ सूत्री वचननामा केजरीवालांकडून जाहीर

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी १३-सूत्री ‘गोवा मॉडेल’ची घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

पणजी : आम आदमी पक्षाचे (Aam Adami Party) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी १३-सूत्री ‘गोवा मॉडेल’ची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘आप’ सत्तेवर आल्यास गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत दहा लाखांचा लाभ मिळेल. (Goa Assembly Election Updates)

केजरीवाल म्हणाले की, गोव्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास आमचे प्राधान्य असेल. सत्ता मिळाल्यावर, गुणवत्तेच्या आधारावर सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, तसेच त्यांना काम मिळेपर्यंत प्रत्येकी तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता देईल. या शिवाय, खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू केले जाईल, तसेच त्याच कालावधीत जमिनीच्या हक्कांचे प्रश्न सोडविले जाईल.

याशिवाय सरकारी शाळांची स्थिती सुधारणे, सर्व गोवेकरांना मोफत शिक्षण देणे आणि राज्यातील रुग्णालये सुधारणे याचाही समावेश आहे.

"आज गोव्यात एकच सरकारी रुग्णालय आहे, ते म्हणजे गोमेकॉ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे व्यावहारिकदृष्ट्या अस्तित्वात नाहीत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात मोहल्ला दवाखाने बांधण्याची आणि सर्व गोवेकरांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याची आमची योजना आहे असे ते पुढे म्हणाले. राज्यातील पहिले भ्रष्टाचारमुक्त सरकार देणारा आप हा पहिला पक्ष असेल आणि १८ वर्षांवरील महिलांना एक हजार रुपये प्रति महिना देणार आहोत, असे केजरीवाल म्हणाले.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पर्यटन उद्योग विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे केजरीवाल यांनी नमूद केले. राज्यात २४ तास मोफत वीज, अखंड पाणीपुरवठा आणि संपूर्ण राज्यात चांगले रस्ते बांधण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

कुठ्ठाळीत प्रचार

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आप नेत्या एलिना साल्ढाना यांच्यासह कुठ्ठाळीमध्ये घरोघरी जाऊन प्रचारात भाग घेतला. गोव्यात भाजप, काँग्रेसची सत्ता होती आणि त्यांनी बदलासाठी काहीही केले नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

वचननाम्यातील मुद्दे

  • सर्वांसाठी रोजगार

  • सहा महिन्यांत खाणकाम पुन्हा सुरू करणे

  • जमिनीच्या हक्काचे प्रश्न सहा महिन्यांत सोडवणे

  • मोफत शिक्षण आणि उत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा

  • प्रत्येक प्रभागात मोफत वैद्यकीय सेवा आणि मोहल्ला दवाखाने

  • भ्रष्टाचारमुक्त सरकार

  • १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेसाठी

  • एक हजार रुपये भत्ता

  • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील

  • व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण

  • पर्यटन विकासाची आंतरराष्ट्रीय मानके

  • २४ तास मोफत वीज

  • २४ तास मोफत पाणीपुरवठा

  • चांगले रस्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT