Amit Palekar : Goa Assembly Election 
देश

Goa Election : अमित पालेकर आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर

कालच आपनं पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला होता. भगवंत मान हे पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : आम आदमी पार्टीनं (AAP) पंजाबनंतर आता गोव्यातही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार (Chief Ministerial Candidate) जाहीर केला आहे. त्यानुसार अमित पालेकर (Amit Palekar) हे आता गोव्यात आपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. आपचे राष्ट्रीय संघटक अरविंद केजरीवाल यांनी याची बुधवारी घोषणा केली. गोव्यात ४० जागांवर आप निवडणूक लढवत आहे. (Goa Assembly Election AAP CM Candidate announced Amit Palekar will be CM Face)

कोण आहेत अमित पालेकर?

गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, अमित पालेकर हे व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. या समाजाची गोव्यात ३५ टक्के इतकी लोकसंख्या आहे. अमित पालेकर हे गोव्यातील एक प्रसिद्ध चेहरा असून सामाजिक कार्यात ते खूपच सक्रीय आहेत. अनेकदा त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेला आहे. पालेकर यांच्यासाठी राजकारण नवं नाही कारण त्यांची आई गोव्यातील सांताक्रूझ भागात दहा वर्षे सरपंच राहिल्या आहेत.

६० वर्षात अडीच वर्षांसाठी झाला होता भंडारी समाजाचा मुख्यमंत्री

केजरीवाल यांनी सांगितलं की, अमोल पालेकर यांनी समाजासाठी खूप काम केलं आहे. गोव्याचं राजकारण पाहता ते खूपच प्रामाणिक उमेदवार आहेत. गोव्यातील एक मोठा भंडारी समाज ३५-४० टक्के इतका आहे. १९६१ मध्ये गोवा स्वतंत्र झाला. तेव्हापासून आजपर्यंत साठ वर्षात या समाजाचा एक व्यक्ती अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT