फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाबद्दल सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.
फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाबद्दल सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. 
देश

'वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट' चित्रपटाने मिळवला गोल्डन पिकॉक पुरस्कार

अवित बगळे

पणजी (गोवा): मोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांच्या 'वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट' या चित्रपटाने 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'गोल्डन पिकॉक'-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला. इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी आज (मंगळवार) या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली.

1990 च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत. यंदाच्या 'कांस' चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला. 40 लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांच्या 'अँजल्स वेअर व्हाईट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

चीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या या सामाजिक चित्रपटातून ही समस्या प्रभावीपणे मांडली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार म्हणून रजत मयुर आणि 15 लाख रुपये दिले जातील. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना 'वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट' या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. एड्सविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. एक प्रेमळ साथीदार आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला कार्यकर्ता त्यांनी ठळकपणे रंगवला आहे.

महेश नारायणन् यांच्या 'टेक ऑफ' या मल्ल्याळी चित्रपटातल्या भूमिकेसाठी पार्वती टी.के यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात युद्धभूमीत बंडखोरांकडून ओलीस ठेवलेल्या पतीच्या सुटकेसाठी संघर्ष करणाऱ्या परिचारिकेची भूमिका त्यांनी साकारली आहे. केरळच्या कोझीकोडे इथल्या या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटांमधे अनेक भूमिकांसाठी पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी रजत मयुर आणि 10 लाख रुपये दिले जातात. महेश नारायणन् यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष ज्यूरी पुरस्कारही देण्यात आला. तिक्रीट इथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेच नाट्य त्यांनी या 'टेक ऑफ' चित्रपटातून मांडले आहे. विशेष ज्यूरी पुरस्कार म्हणून 15 लाख रुपये, रजत मयुर आणि सन्मानपत्र प्रदान केले जाते.

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा (कथापट) पुरस्कार बोलिवियाचे दिग्दर्शक किरो रुसो यांच्या 'डार्क स्कल' या चित्रपटाने मिळवला. रजत मयुर सन्मान मिळवणारा हा रुसो यांचा पहिलाच चित्रपट आहे. मनोज कदम यांच्या 'क्षितिज' या मराठी चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाचा पुरस्कार मिळवला. महात्मा गांधींचे शांतता आणि मानवी अधिकार, दोन संस्कृतींमधला संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्तींमधे विविधता जपणे आणि वृद्धिंगत करणे, या युनेस्को तत्वांच्या आशयाचा अविष्कार करणाऱ्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो.

या महोत्सवात कॅनडाचे कला दिग्दर्शक ॲटम इगोयान यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. 10 लाख रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपट क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. इजिप्तमध्ये जन्मलेले फ्रेंच कॅनडीयन चित्रपट निर्माते ॲटम इगोयान यांनी आपल्या चित्रपटातून एककीपणाची आणि दुरावलेपणाची भावना अभिव्यक्त केली आहे. त्यांच्या चित्रपटात तंत्रज्ञान, प्रशासकीय किंवा इतर सत्ता केंद्रांमधे असलेली व्यक्तिमत्वे आणि त्यांचे एकाकीपण चित्रित केले जाते. एक विशिष्ट आखीव-रेखीव संकल्पना नसलेल्या त्यांच्या चित्रपटात वेगवेगळ्या दृष्यांची मांडणी अशी असते की प्रेक्षक त्यात भावनिक दृष्ट्या गुंतून जातात. आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांचे चित्रपट दाखवण्यात आले आहेत. 'एक्झॉटीका', 'द स्वीट हीयरआफ्टर' आणि 'रिमेंबर' हे त्यांचे चित्रपट यंदाच्या महोत्सवात दाखवण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाच्या इफ्फीमध्ये चित्रपटसृष्टीतील 'पर्सन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले. जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT