Gold  sakal media
देश

नववर्षात सोने महागणार? ओमिक्रॉनचा आणि महागाईचा फटका!

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नववर्षात सोन्याच्या (Gold price may increases) किमती वाढण्याची शक्यता आहे. वाढती महागाई (Inflation) आणि ओमिक्रॉनचा प्रभाव (Omicron impact) यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोन्याच्या किमती प्रतितोळा ४८ हजारांच्या जवळ आहेत. त्या वाढून ५५ हजारांच्या पार जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Gold price may increases in new year 2022 because of omicron variant and inflation)

अमेरिकेसह इतर देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे सोन्याचे भाव प्रभावित होऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे. जाणकारांच्या मते २०२२ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याचा भाव १७०० ते १९०० डॉलर प्रतिऔन्स असू शकतो. दुसऱ्या तिमाहीत किमती दोन हजार डॉलर पार करू शकतात. म्हणजेच भारतात या किमती ४५ ते ५० हजार आणि ५५ हजार प्रतितोळा होऊ शकतात.

दरम्यान, आज सोन्याच्या किमती घसरून ४७,९०० प्रतितोळा झाल्या. गुरुवारचे भाव ४८ हजारपेक्षा जास्त होते. चांदीच्या किमतीतसुद्धा आज घसरण झाली. आज चांदीचा भाव ६२,१६० रुपये प्रतिकिलो नोंदवला गेला. म्हणजे चांदी ४० रुपये स्वस्त झाली. ऑगस्ट २००२ मध्ये सोन्याची किंमत ५६,२०० प्रतितोळा इतकी होती. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात १४ टक्के घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT