oil
oil esakal
देश

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, खाद्यतेल होणार स्वस्त!

सकाळ डिजिटल टीम

महागाईला कंटाळलेल्या जनतेला येत्या काही दिवसांत थोडा दिलासा मिळणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलाच्या किमती कमी होवू शकतात. खाद्य तेलआणि उत्पादकांनी अन्न आणि ग्राहक मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर तेलाच्या किमती कमी करण्याचे मान्य केले आहे. विदेशातील झालेल्या खाद्य तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या नंतर देशांतर्गत किमती कमी होऊ शकतात. घसरलेल्या किमतींचा लाभ ग्राहकांनाही मिळावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.

जागतिक बाजारपेठेत किमती नरमल्यानंतर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यास तेल उत्पादकांनी सहमती दर्शवली आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 10-12 रुपयांनी कमी होऊ शकतात. मात्र गेल्या महिन्यात तेल निर्मात्यांनीही किमती कमी केल्या,परंतु मंत्रालयाचे असे मत आहे की, जागतिक किमतीत घसरण झाल्यानंतर अजूनही किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये खाद्यपदार्थ निर्माता कंपनी अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किमती 30 रुपये प्रति लिटरने कमी केल्याची घोषणा केली.

भारत खाद्य तेलाचा दोन तृतीयांश हिस्सा आयात करतो. मागील काहि महिन्यात झालेल्या रशिया युक्रेन युध्दात आणि इंडोनेशिया कडून पाम तेलावर निर्यातीवर बंदी घातल्याने खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठ तेलाच्या किमतीत घसरन झाली. किमत आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी केंद्राने मे महिन्यापासून तेल निर्मात्यांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत. भारत पाम तेलाच्या आयातीसाठी इंडोनेशिया आणि मलशिया वर आणि सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलासाठी युक्रेन अर्जेंटिना, ब्राझील आणि रशियावर अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT