Farmer  File Photo
देश

खूशखबर! PM किसान योजनेचा हप्ता उद्या होणार जमा

सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार कार्यक्रम

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उद्या (शुक्रवार, १४ मे) आठवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं याबाबत माहिती दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उद्या १९,००० कोटींहून अधिक निधी ९.५ कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यातील काही लाभार्थी शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री देखील उपस्थित असतील.

तीन समान हप्त्यात मिळणार निधी

दरम्यान, पीएम-किसान योजनेंतर्गत ६,००० रुपये प्रतिवर्ष आर्थिक मदत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे. ही रक्कम वर्षात चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे. या आर्थिक मदतींची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. या योजनेंतर्गत १.१५ लाख पेक्षा अधिक सन्मान निधी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT