देश

मॉन्सूनची गुड न्यूज;पाऊस यंदा सरासरी गाठणार 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे देशाची अवघी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना यंदा मॉन्सूनच्या सरी समाधानकारक कोसळणार असल्याची गुड न्यूज आज हवामान खात्याने दिली आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मॉन्सून दमदार हजेरी लावत शंभर टक्के बरसेल, असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने आज जाहीर केला.

मॉन्सून केरळच्या किनाऱ्यावर एक जूनला दाखल होईल. मात्र महाराष्ट्रात पोचण्यासाठी त्याला तीन ते सात दिवसांचा विलंब होऊ शकतो. असाच विलंब गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पोचण्यास होणार असून ईशान्य भारतामध्ये मात्र तो आठ जुलैला पोचेल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन आणि हवामान खात्याचे महासंचालक महापात्रा यांनी आज पत्रकार परिषदेत मॉन्सूनचा प्राथमिक अंदाज जाहीर केला.

मॉन्सूनचा सुधारीत अंदाज मेच्या अंतिम आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल. विभागनिहाय पाऊस कसा असेल याचाही खुलासा त्यावेळी केला जाईल. सचिव एम. राजीवन म्हणाले, की ‘‘ कोरोनामुळे सध्याच्या चिंताजनक वातावरणात चांगली बातमी आहे, की यंदा मॉन्सूनची सरासरी 100 टक्के राहील. कृषी क्षेत्रासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी देखील ही चांगली बातमी आहे. अर्थात, त्यात पाच टक्के वध घट होऊ शकते.’’ 

अशी असते सरासरी 
पावसाची दीर्घकालीन सरासरी 1961 ते 2000 पर्यंतचा आकडा आधारभूत मानून काढली जाते. यात एलपीए नुसार 88 सें.मी. भारताची सरासरी आहे. 96 ते 104 टक्क्यांमध्ये मॉन्सून सर्वसाधारण मानला जातो. तर, सरासरी एवढ्या पावसाची यंदाची शक्यता सर्वाधिक म्हणजे 41 टक्के असल्यामुळे यंदा 100 टक्के मॉन्सूनचा अंदाज आहे. 

एल निनोचा प्रभाव नाही 
भारतीय मॉन्सूनवर परिणाम करणाऱ्या एल निनो आणि ला निना या प्रशांत महासागरातील समुद्री प्रवाहांवर हवामान खात्याचे बारकाईने लक्ष असते. ला निनाची सक्रियता मान्सूनसाठी चांगली मानली जाते. यंदा जुलै ते ऑगस्ट या कालावधीत ला निना सक्रिय असेल तर एल निनो प्रवाह उदासीन राहण्याची शक्यता असल्यामुळे मॉन्सून चांगला राहील. 

महाराष्ट्रातील प्रवेश 
महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश तीन ते सात दिवसांनी लांबण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतपर्यंतच्या निर्धारीत तारखांमध्ये बदलाची शक्यताही हवामान खात्याने बोलून दाखविली आहे. त्यानुसार पुण्यात नऊ ऐवजी 10 जूनला मॉन्सून पोहोचेल. तर मुंबईत 10 ऐवजी 11 जूनला तो दाखल होईल. नगरमध्ये 10 ऐवजी 12 जून आणि नागपूरमध्ये 13 ऐवजी 15 जून ला मॉन्सून धडकेल. 

असे होईल आगमन 
त्रिवेंद्रम - 1 जून 
चेन्नई- 1 जून ऐवजी 4 जून 
दिल्ली - 23 ऐवजी 27 जून 
गोवा - 7 जून 
हैदराबाद – 7 जून ऐवजी ऐवजी 8 जून 
सुरत - 13 जून ऐवजी 19 जून 
रायपूर - 13 ऐवजी 16 
अहमदाबाद - 14 जून ऐवजी 21 जून 
कोलकाता - 10 जून ऐवजी 11 जून 
भुज - 21 ऐवजी 30 जून 
भोपाळ - 15 जून ऐवजी 22 जून 
वाराणसी - 15 ऐवजी 20 जून 
इंफाळ - 1 ऐवजी 5 जून 
जयपूर - 23 जून ऐवजी 1 जुलै 
लखनौ - 20 ऐवजी 23 जून 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT