देश

गुगलकडून भारतात ऑक्सिजन प्लांटसाठी 113 कोटींचे अनुदान

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जगातील विख्यात आयटी कंपनी गुगल आता कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये पुढे सरसावली आहे. गुगलने गुरुवारी म्हटलंय की, त्यांची लोककल्याणकारी संस्था Google.org वेगवेगळ्या संस्थांसोबत एकत्र येत देशात 80 ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सची खरेदी तसेच स्थापना करणार आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासामध्ये मदतीसाठीही गुगल 113 कोटी रुपयांचे (1.55 कोटी डॉलर) अनुदान देणार आहे.

Google.org ने या घोषणेअंतर्गत 80 ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सच्या स्थापनेसाठी गिव्ह इंडियाला जवळपास 90 कोटी रुपये आणि पाथला (PATH) जवळपास 18.5 कोटी रुपये देणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अपोलो मेडस्कील्सच्या (Apollo Medskills) माध्यमातून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी 20 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केलं जाईल.

यासाठी Google.org भारतातील 15 राज्यांमध्ये 180,000 आशा कार्यक्रत्यांना आणि 40,000 एएनएमच्या कौशल्य विकासासाठी 3.6 कोटी रुपये (पाच लाख अमेरिकन डॉलर) अनुदान अरमानला देणार आहे. अरमान (ARMMAN) या अनुदानाचा वापर आशा आणि एएनएमला अधिक सहाय्य देण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना देखील केली जाईल. गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी म्हटलंय की, गुगलमध्ये आम्ही या बाबीवर नेहमीच लक्ष दिलंय की, लोकांकडे सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि उपकरणे असावित.

याआधी युनिसेफने देखील भारतात नऊ ऑक्सिजन प्लांट लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय युनिसेफने भारतात 4,500 हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 200 आरटीपीसीआरच्या मशीन उपलब्द करुन दिल्या आहेत. हे नऊ प्लांट्स गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या हॉस्पिटल्समध्ये लावले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT