देश

गौरी लंकेश हत्या प्रकरणः किणयेत गोळ्या हस्‍तगत

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्येसाठी संशयितांना बेळगाव तालुक्‍यातील किणये येथे प्रशिक्षण देण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. गुरुवारी (ता. २७) एसआयटीने किणये येथील सरकारी जमिनीवर विशेष शोध मोहीम राबवून प्रशिक्षणासाठी वापरलेल्या पिस्तुलाच्या गोळ्या, पुंगळ्या हस्तगत केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून ‘सकाळ’ला मिळाली आहे. त्यामुळे खानापूरमधील चिखलेबरोबरच बेळगावातील किणये येथे बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किणये गावापासून पुढे डोंगरावर सीड फॉरेस्ट म्हणून ओळखली जाणारी पंधरा एकर सरकारी जमीन असून झुडुपांनी वेढलेली आहे. याच ठिकाणी एसआयटीने गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शोध मोहिम राबवत पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या सहा गोळ्या आणि या गोळ्यांच्या पुंगळ्या हस्तगत केल्या. मागील दोन महिन्यांपासून बेळगावात पुराव्यांचा शोध घेणाऱ्या एसआयटीला अखेर यश आले आहे.

आतापर्यंतच्या तपासकार्यात ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्येचा कट रचण्यासाठी २२ युवकांना गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. खानापूर तालुक्‍यातील चिखले येथील भरत कुरणे याच्या रिसॉर्टवर प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झाले होते. चिखले येथे शोधमोहीमही राबविण्यात आली. सुधन्वा गोंधळेकरला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी किणये येथेही शोध मोहीम राबविल्यानंतर याठिकाणी प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्या सापडल्या आहेत.

शरद कळसकर बेळगावात २०१५ ते २०१७ पर्यंत वास्तव्यास होता. यापूर्वी त्यालाही बेळगाव आणि खानापूरात फिरवून एसआयटीने पुरावे जमा केले आहेत. तर पंधरा दिवसांपूर्वी बेळगावात गोंधळेकरला आणले होते. पुन्हा २७ सप्टेंबर रोजी त्याला बेळगावात आणून चौकशी सुरू केली. त्यानुसार त्याने किणये डोंगराची माहिती दिली.

निर्जन स्थळाची निवड
किणये गावापासून काही अंतरावर झाडी आणि झुडुपे असून डोंगराच्या पलीकडचा भाग खानापूर तालुक्‍याचा आहे. तेथे मोकळे रान असून नेमके डोंगरावर काय चालले आहे, कुणाला समजत नाही. त्यामुळे अशा शांत परिसराची बंदूक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT