r-k-sinha
r-k-sinha 
देश

चिनी ऊर्जा कंपन्यांना सरकारचा झटका

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भारतीय ऊर्जा क्षेत्रात  चिनी उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  चीन, पाकिस्तानसाख्या देशांकडून वीज उत्पादनांशी संबंधित उपकरणे आयात केली जाणार नाही, असे ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी आज स्पष्ट केले. 

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जामंत्र्यांच्या संमेलनात सिंह यांनी ही घोषणा केली. वीज वितरण कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे सरकारचे लक्ष्यही त्यांनी जाहीर केले. सरहद्दीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 59 चिनी ॲपवर  बंदी घालून पहिला झटका दिला होता. पाठोपाठ परिवहन मंत्री नितीन गडकरींनी देखील महामार्ग बांधणीच्या कामांमधून चिनी कंपन्यांना बाजूला सारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ऊर्जा क्षेत्रातूनही चिनी कंपन्यांना डच्चू मिळणार आहे. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या ऊर्जामंत्र्यांच्या संमेलनात बोलताना केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितेल, की  ‘‘ प्रायर रेफरन्स कंट्री (पुर्वोल्लिखित देश) या श्रेणीत येणाऱ्या देशांकडून वीज उपकरणे आयात करण्याची परवानगी नसेल. अशा देशांची यादी तयार केली जात आहे. मात्र यात प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचा समावेश आहे.  राज्यांनीही याबाबत पावले उचलावीत.’’ प्रायर रेफरन्स कंट्री या श्रेणीमध्ये, देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक देशांचा समावेश होतो.

शत्रू देशाकडून आयात कशाला?
सिंह म्हणाले, की  बहुतांश उपकरणांचे उत्पादन भारतात होते. असे असूनही मोठ्या प्रमाणात अशा उपकरणांची आयात केली जाते. आता हे चालणार नाही. देशात २०१८-१९ मध्ये ७१००० कोटी रुपयांच्या उपकरणाची आयात झाली. यामध्ये चीनकडून तब्बल २१ हजार कोटी रुपयांची आयात झाली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जो देश आपल्या सैनिकांवर प्राणघातक हल्ले करतो, आपला भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करतो, तेथील रोजगार आपण का वाढवावा, असा आक्रमक सवाल करून या बंदीचे  सिंह यांनी जोरदार समर्थन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : अर्धशतक करणारा तिलक वर्मा रनआऊट, सामना रोमांचक वळणावर

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT