Government introduces social security cover for gig workers, ensuring financial protection, insurance benefits, and improved job security across India.

 

esakal

देश

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Gig Workers Social Security Cover: जाणून घ्या, नेमकी काय आहे अट आणि कोणते लाभ मिळणार?

Mayur Ratnaparkhe

government announces a major decision for gig workers : सरकारने  ‘गिग वर्कर्स’बाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या ‘गिग इकॉनॉमी’ला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी आता तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता अंतर्गत नवीन मसुदा नियम जारी केले आहेत, जे स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट सारख्या प्लॅटफॉर्मच्या डिलिव्हरी पार्टनर्स आणि कॅब ड्रायव्हर्सना सामाजिक सुरक्षा फायदे प्रदान करतात. 

मसुदा नियमांनुसार, एकाच कंपनी किंवा प्लॅटफॉर्मशी संबंधित गिग वर्कर्सना एका आर्थिक वर्षात किमान ९० दिवस त्या प्लॅटफॉर्मसाठी काम करावे लागेल. तर अनेक प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांसाठी, ही मर्यादा १२० दिवसांवर निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, जर एखादा कामगार एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करत असेल तर ते तीन दिवस म्हणून गणले जाईल. यामुळे किमान दिवसांची आवश्यकता पूर्ण करणे सोपे होईल. या नियमांचे उद्दिष्ट गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच संरक्षण प्रदान करणे आहे.

याशिवाय, प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी, सरकारने गिग वर्कर्ससाठी नोंदणी अनिवार्य केली आहे. १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व गिग वर्कर्सना त्यांच्या आधार कार्डसह नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांचा डेटा ई-श्रम पोर्टलवर नोंदवला जाईल. शिवाय, प्रत्येक नोंदणीकृत वर्करला एक विशिष्ट ओळख क्रमांक आणि डिजिटल ओळखपत्र मिळेल, जे देशभर वैध असेल.

सरकारी पोर्टलवर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व कामगारांची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी अ‍ॅग्रीगेटर कंपन्या घेतील. यामध्ये थर्ड पार्टी किंवा भागीदार एजन्सींद्वारे काम करणाऱ्या कामगारांचाही यात समावेश असेल.

कोणते फायदे मिळतील? -

नवीन नियमांनुसार, गिग वर्कर्सना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य आणि जीवन विमा, कामाशी संबंधित अपघात कव्हर आणि ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याचा प्रस्ताव आहे. एवढंच नाहीतर भविष्यात पेन्शन योजनेचाही विचार केला जात आहे. तर  ६० वर्षांच्या वयानंतर गिग वर्कर्स या फायद्यांसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच दरवर्षी किमान कामाचे दिवस पूर्ण करणे अनिवार्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

Latest Marathi News Live Update: सहकार कायद्यात काळानुरूप होणार ' बदल ' राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती जाहीर

T20 World Cup: टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघांची घोषणा; नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संपूर्ण टीम

Pune Election 2026 : कात्रजमध्ये निवडणुकीचा मोठा 'धडाका'! नाकाबंदीत तब्बल ६७ लाखांची रोकड जप्त

Pune Robbery : रुग्णाच्या नावाखाली सापळा; सहकारनगर हद्दीत डॉक्टरला लुटणारे सीसीटीव्हीत कैद!

SCROLL FOR NEXT