देश

coronavirus: अर्धी लोकसंख्या फेब्रुवारीपर्यंत बाधित; सरकारी समितीचा अंदाज

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील जवळपास ५० टक्के म्हणजेच १.३ अब्ज लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला असेल असा अंदाज सरकारी समितीने व्यक्त केला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ७५ लाख एवढी असून अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सप्टेंबरच्या मध्यावधीत कोरोनाच्या संसर्गाने उच्चांक गाठला होता असे सरकारचे म्हणणे आहे. आम्ही तयार केलेल्या गणितीय मॉडेलनुसार सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ३० टक्के एवढी असून फेब्रुवारीपर्यंत ती ५० टक्क्यांच्या घरामध्ये जाईल असा अंदाज आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि सरकारी समितीचे सदस्य मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान हे प्रमाण सरकारने सिरो सर्व्हेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा खूप अधिक आहे. हा अंदाज व्यक्त करणाऱ्या समितीमध्ये विषाणूतज्ञ, वैज्ञानिक आणि काही संशोधकांचा देखील समावेश होता. लोकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर दरमहा कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये २.६ दशलक्ष लोकांची भर पडू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'एसआयआर'मधून नाव वगळल्यास नागरिकत्व धोक्यात येईल का? सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, निवडणूक आयोगाला बजावली नोटीस

Cow Slaughter Case: जुन्नरमध्ये माई मोहल्ल्यात गोवंश कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई; २७० किलो गोमांस जप्त, आठ जणांवर गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे गोरखपूरमधील अनेक भाग जलमय

ST Fare Hike : एसटी प्रवास महाग: राज्य परिवहन प्राधिकरणाकडून १३.५६ टक्के भाडेवाढ, हंगामी वाढ रद्द

Ketan Agarwal Killed Case : आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मध्यस्थांचीही चौकशी करा; पोलिसांनी सखोल तपास करण्याची वडिलांची मागणी

SCROLL FOR NEXT