Raghubar Das  
देश

Odisha Governor Son: राज्यपालांच्या मुलाची मुजोरी! लक्झरी कार पाठवली नाही म्हणून अधिकाऱ्याला मारहाण

Governor Raghubar Das son Assaulted staffer: ७ जुलैला ही घटना राजभवन परिसरातच घटली आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या भेटीदरम्यान तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची पोस्टिंग झाली होती.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ओडिशाच्या राजभवनमध्ये तैनात असणाऱ्या एका अधिकाऱ्याने धक्कादायक आरोप केले आहेत. राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलाने त्याला घेण्यासाठी लक्झरी कार न पाठवलेल्यामुळे मारहाण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अधिकाऱ्याने याप्रकरणी राज्यपालांच्या मुख्य सचिवांना लिखित तक्रार केली आहे.

माहितीनुसार, बैकुंठा प्रधान ( वय ४७) हे राजभवनमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून तैनात आहेत. त्यांनी आरोप केलाय की, दास यांचा मुलगा ललीत कुमार आणि इतर पाच जणांनी त्यांना चापटा-लाथा मारल्या आणि मारहाण केली. ७ जुलैला ही घटना राजभवन परिसरातच घडली आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या भेटीदरम्यान तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची पोस्टिंग झाली होती.

१० जुलै रोजी प्रधान यांनी लिखित तक्रार सचिवांकडे दाखल केली आहे. पण, इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, राजभवनचे अधिकारी आणि सचिव ससवत मिश्रा यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही. तक्रारीमध्ये प्रधान यांनी म्हटलंय की, पुरीतील राजभवनाचा चार्ज असल्याने ५ जुलेपासून मी तेथे तैनात होतो. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू या राजभवनात येणार असल्याने तयारीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती.

प्रधान यांनी आरोप केलाय की, ७ जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास ते ऑफिस रुममध्ये बसले होते. राज्यपालांचा खासगी स्वयंपाकी आला अन् त्याने सांगितलं की कुमार यांनी बोलावलं आहे. ज्यावेळी कुमार यांनी मला पाहिलं, तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ सुरु केली. मी जेव्हा या अपमानाला विरोध केला तेव्हा त्यांनी मला मारहाण सुरु केली.

प्रधान यांनी दावा केलाय की, यानंतर त्यांनी तेथून पळ काढला आणि लपून बसले. पण, त्यांना शोधण्यात आले आणि त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. याप्रकरणी प्रधान यांच्या पत्नी सयोज या ११ जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेल्या होत्या, पण तक्रार स्वीकारण्यात आलेली नाही असं कळतंय. त्यामुळे पोलिसांना ईमेल केल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT