nirmala-sitharaman 
देश

काळ्या बुरशीच्या औषधांवर कर नाही, लसींवर पाच टक्के GST

किती टक्के जीएसटी आकारायचा ते ठरलं

दीनानाथ परब

नवी दिल्ली: लसी आणि कोविडशी संबंधित साहित्यावरील कर रचनेच्या स्लॅब संदर्भातील शिफारशींवर जीएसटी परिषदेने शनिवारी मंजुरी दिली. लसींवर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यानंतर ऑक्सीमीटरवर पाच ते १२ टक्के जीएसटी आकारला जाईल तसेच रुग्णवाहिकेवरील जीएसटी २८ वरुन १२ टक्के करण्यात आला आहे.

चार वर्गातील उत्पादनांवर किती जीएसटी लावायचा त्याचे दर आज निश्चित करण्यात आले. यात औषधे, ऑक्सिजन, ऑक्सिजन निर्मिती करणारी उत्पादने, चाचणी किट, कोविड संदर्भातील साहित्य आणि अन्य मशीन्सवर किती टक्के जीएसटी आकारायचा त्याचे दर निश्चित करण्यात आले. लवकरच हे दर जाहीर करण्यात येतील असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. (GST rates have been decided for 4 categories) (सविस्तर वृत्त लवकरच)

"लसींवर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल. आधी जाहीर केल्याप्रमाणे केंद्र सरकार ७५ टक्के लशींची खरेदी करणार असून त्यावर जीएसटी भरणार आहे. जीएसटीमधुन येणारे ७० टक्के उत्त्पन्न राज्यांसोबत वाटले जाते" असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले.

"इलेक्ट्रीक भट्टी, तापमान मोजण्याच्या उपकरणावरील GST पाच टक्के आणि रुग्णवाहिकेवरील GST १२ टक्क्याने कमी करण्यात आला आहे. सप्टेंबर पर्यंत हे दर कायम राहतील" असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले. काळ्या बुरशीच्या औषधांवरील कर शून्य टक्के करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT