Amit Shah
Amit Shah 
देश

सकाळी 11.15 वाजता: गुजरात आणि 'हिमाचल'मध्ये भाजपच!

सकाळ डिजिटल टीम

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा किंचितसा आघाडीवर आला. मात्र, गुजरातमधील कल पाहता भाजप विजयाच्या शंभरीजवळ येऊन थांबला आहे. हिमाचलमध्ये मात्र भाजपकडे आघाडी आहे. 

सकाळी साडेआठ वाजता समजलेला कल भाजपच्या बाजूने होता. नंतरच्या अर्ध्या तासात कल बदलू लागला. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच पहिल्या तासातील कल भाजपच्या विरोधात दिसला. त्यानंतरच्या अर्ध्या तासात पुन्हा भाजपच्या बाजूने कल गेला. गुजरातमधून मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल धक्कादायकरित्या पिछाडीवर आहेत. 

काँग्रेसने गुजरातमध्ये भाजपच्या तोंडचे पाणी पळवल्याचे सकाळी दिसत होते. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

कल असा
गुजरात विधानसभा निकाल/कल: 

  • एकूण जागा: 182
  • भाजपः 100
  • काँग्रेसः 80
  • अपक्ष/इतर: 02

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल/कल: 

  • एकूण जागा: 68
  • भाजपः 44
  • काँग्रेसः 220
  • अपक्ष/इतर: 4

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट होत आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. यावेळेस जनता जनार्दन आपला कौल भाजपच्या बाजूने देते, की पुन्हा काँग्रेसला सत्ताधीश बनविते, हे थोड्याच वेळात समजणार आहे. 

#GujaratVerdict | Gujarat Assembly Election Result 

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, "ओबीसीं'चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली. 

हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT