Guajrat Result Gujarat Elections Marathi Websites #GujaratVerdict BJP trailing
Guajrat Result Gujarat Elections Marathi Websites #GujaratVerdict BJP trailing 
देश

सकाळी 9.20 वाजता: गुजरातमध्ये भाजप धक्कादायक पिछाडीवर

सकाळ डिजिटल टीम

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर असल्याचे दिसते आहे. हिमाचलमध्ये मात्र भाजपकडे आघाडी आहे. 

सकाळी साडे आठ वाजता समजलेला कल भाजपच्या बाजूने होता. नंतरच्या अर्ध्या तासात कल बदलू लागला आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच पहिल्या तासातील कल भाजपच्या विरोधात दिसतो आहे. 

कल असा
गुजरात विधानसभा निकाल/कल: 

  • एकूण जागा: 182
  • भाजपः 78
  • काँग्रेसः 88
  • अपक्ष/इतर: 03

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल/कल: 

  • एकूण जागा: 68
  • भाजपः 38
  • काँग्रेसः 23
  • अपक्ष/इतर: 2

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट होत आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. यावेळेस जनता जनार्दन आपला कौल भाजपच्या बाजूने देते, की पुन्हा काँग्रेसला सत्ताधीश बनविते, हे थोड्याच वेळात समजणार आहे. 

#GujaratVerdict | Gujarat Assembly Election Result 

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, "ओबीसीं'चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली. 

हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT