Court sakal media
देश

ज्याच्या हत्येच्या आरोपाखाली होते अटकेत, तो होता जिवंत; सहा वर्षांनी दोघांची सुटका

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमधील नवसारी न्यायालयाच्या अखत्यारित एक अनोखी घटना घडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या दोन जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या दोघांवरही हत्येचा आरोप होता. मात्र, ज्याच्या हत्येचा त्या दोघांवर आरोप होता, तो व्यक्तीच जिवंत होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सारंगा व्यास यांनी 30 मार्च रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशामध्ये तपास अधिकारी आणि नवसारीमधील तत्कालीन नीरीक्षक प्रदीप सिंह गोहिल यांना बेजबाबदारपणे तपास केल्याचा ठपका ठेवत दोघांना 50-50 हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. कोर्टाने म्हटलंय की तपास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या दोघांना मानसिक आणि शारिरीक त्रासातून जावं लागलं तसेच त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित हत्या प्रकरणामध्ये नवसारी ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्यात आली होती. त्या आधारावर आरोपी मदन पिपलादी आणि सुरेश पतेला यांना 6 जुलै 2016 रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांना मिळालेला मृतदेहाची चुकीची ओळख ठरवली गेली आणि त्याला गयारी हा मृत व्यक्ती मानलं गेलं. या आरोपींना आपल्या सुटकेच्या आधी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगातच रहावं लागलं होतं. कोर्टाने त्यांना पाच दिवसांपूर्वी सोडून दिलं आहे.

नेमका कसा आणि कुठे झाला घोळ?

वास्तविकत: गयारी हा गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चुकीच्या मृतदेहाला गयारी ठरवून पोलिसांनी तो त्याच्या नातेवाईंकांकडे सुपुर्द केला. नातेवाईकांनीही त्याला आपल्या गावी नेऊन त्याचे अंतिम संस्कार करुन टाकले. मात्र, काही तासांनंतर गयारीच्या भावाला कळालं की तो जीवंत असून त्याच्या नातेवाईकांकडेच राहतो आहे. त्याने याबाबत पोलिसांना माहितीही दिली. मात्र, तरीही पोलिसांनी त्या दोन जणांवर आरोपपत्र दाखकल केलं की त्या दोघांनीच गयारीची हत्या केली आहे. कारण गयारी एके रात्री चोरुन त्यांच्या घरात घुसला होता. हे कथित मृत आणि कथित आरोपी हे तिघेही एकाच फॅक्टरीमध्ये काम करायचे आणि एके रात्री अन्नाच्या शोधात गयारी त्यांच्या घरात घुसरला होता. त्यानंतर भीतीने तो नवसारीमधून पळून गेला आणि एका नातेवाईकांकडे राहू लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SC Classification : शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरातीत एससी प्रवर्गाची विभागणी; नव्या वादाला फुटले तोंड, राज्यात उपवर्गीकरण लागू?

जुहूतील आलिशान घर ते लक्झरी कार! श्रद्धा कपूरची संपत्ती ऐकून थक्क व्हाल! तब्बल'इतक्या' कोटींची आहे मालकीन

FIFA WORLD CUP 2026: अमेरिकेचा दबदबा! पॅराग्वेचा फडशा; ९६ वर्षांत न झालेला चमत्कार झाला... कॅनडाने कसाबसा पराभव टाळला

Pune Crime: पुण्यात MBBS प्रवेशाच्या नावाखाली ४० जणांना गंडा, लाखोंची फसवणूक; ऑर्थर रोड जेलमधून आरोपी ताब्यात

Monsoon El Nino Impact : विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात अलनिनोचा प्रभाव तीव्र; मॉन्सूनवर परिणाम, हवामान विभागाने व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT