देश

गुजरात मॉडेलच्या चिंधड्या; आयसोलेशन वॉर्डमध्ये मृतदेहांचा खच

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून मृतांची संख्या वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून मृतांची संख्या वाढली आहे.

अहमदाबाद - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून मृतांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्लीने कर्फ्यू लागू केला आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. गुजरातच्या वलसाड जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये तर मृतदेहांचा खच पडला आहे. शवविच्छेदनाच्या खोलीत तर मृतदेहा इकडे तिकडे ठेवण्यात आले आहेत. मृत्युची संख्या वाढल्यानं अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेलं मृत्यू प्रमाणपत्र तायर करण्यास वेळ लागत आहे. मृत्यू झाल्यानंतर बराच काळ मृतदेह तिथेच राहिल्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्यही पसरलं आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासाचे ढोल वाजवले जात होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमधील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा खऱ्या अर्थाने स्पष्ट झाल्याचं दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयातील सुपरिटेंडेंट अमित शाह यांनी सांगितलं की, इथं कोरोना रुग्णांसाठी 400 बेड आहेत. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्ण इथं येत आहेत. त्यावेळी त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. कोरोना वॉर्डातून पोस्टमार्टम रुमपर्यंत मृतदेह आणण्यासाठी बाहेरून कामगार मागवण्यात येत आहेत. आमचं आवाहन आहे की, लोकांनी मदतीसाठी पुढं यावं. मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक तास लागत आहेत.

वलसाड जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे नातेवाइक मृतदेहासाठी वाट पाहत उभा आहेत. यातील काहींना तर एक दोन दिवस वाट पाहिल्यानंतरही मृतदेहाचं अंत्यदर्शनही घेता आलेलं नाही. रुग्णालयाच्या अशा कारभारामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गुजरातमध्ये रविवारी 10 हजार 340 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 110 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे 3 हजार 981 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 4 लाख 4 हजार 561 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 लाख 37 हजार 545 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 5 हजार 377 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 61 हजार 467 सक्रीय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT