Punjab Politics  Team eSakal
देश

पंजाब काँग्रेसची पडझड! आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ: गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ घडून येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदी बसवण्यात आलं आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असणारे पंजाब काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील थोड्याच वेळा पूर्वी आपली नाराजी व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या या राजीनाम्याचा धक्का अद्याप ताजा असतानाच आता आणखी एक धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने सिद्धूंच्या मागोमाग आपल्याही पदाचा राजीनामा दिला आहे.

गुलझार इंदर चहल यांनी देखील आता कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर गुलजार इंदर चहल यांनी पंजाब काँग्रेसचे कोषाध्यक्षपद सोडले आहे. सुपूर्द केलेल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, माणसाचे चारित्र्य कोसळण्याची सुरुवात ही तडजोड करण्यापासून सुरु होते. मी पंजाबच्या भविष्या आणि कल्याणाबाबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळेच मी पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हजार रुपयांच्या UPI पेमेंटवर किती अतिरिक्त शुल्क लागणार? हा नियम नेमका कुणासाठी? जाणून घ्या...

Cockroch Janta Party: दिपकेच्या घरी कोअर कमिटीची बैठक, रणनिती ठरणार

Latest Marathi News Live Update : लोकसभा ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पुन्हा भरेपर्यंत स्थगित

Lohara Politics: लोहारा राजकारणात मोठी खळबळ! अमोल बिराजदारांना भाजपची खुली ऑफर; नगराध्यक्षपदाचीही चर्चा

'आज मौनव्रत आहे!' पत्रकारांच्या प्रश्नांवर रवी किशन यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले...'पंडित जी ने आज मौन...'

SCROLL FOR NEXT