देश

"केंद्रीय मंत्र्यांच्या रॅलीत हवेत गोळीबार; यावरून भाजपची..."

विराज भागवत

राष्ट्रवादीच्या नेत्याने घडलेल्या प्रकारावर केली बोचरी टीका

मुंबई: कर्नाटकच्या बिदर या शहरात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची रॅली सुरू होती. त्यावेळी भाजप समर्थकांनी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत त्यांच्याच समोर हवेत गोळीबार केला. असा प्रकार घडणे म्हणजे भाजपने लोकशाही गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. त्यामुळे अशा प्रकारांवरून अंदाज येतो की भविष्यात भाजपची पाऊले कुठल्या दिशेने जात आहेत, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत गोळीबार होतो ही बाब अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या नेतृत्वावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भविष्यात आता भाजपची पाऊले कुठल्या तरी वेगळ्याच दिशेने पडतील यात दुमत नाही, असे महेश तपासे म्हणाले. त्यासोबत, ज्या केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला, त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला जायला हवा आणि त्यांची पंतप्रधान मोदी यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करायला हवी, अशी स्पष्ट मागणी देखील त्यांनी केली.

कर्नाटकमधील बिदर भागात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी हवेत गोळीबार करत केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे जोरदार स्वागत केले. यामुळे सर्वसामान्य जनतेत दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांकडे विना परवाना शस्त्रास्त्र होती. याचाच अर्थ भाजपचे लोक जनसामान्यांना घाबरवण्यासाठी याचा कधीही वापर करत असतील. त्यामुळे मोदी सरकारकडे थोडी जरी नैतिकता असेल तर अशा केंद्रीय मंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी. भाजपने नैतिकता म्हणून भगवंत खुबा यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT