dogs 
देश

पाळीव श्वानाला कुत्रा म्हटल्यामुळे दोन जणात तुंबळ हाणामारी

पाळीव श्वानाला कुत्रा म्हणणं पडलं महागात!

शर्वरी जोशी

पेट लव्हर असणं म्हणजेच आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करणं चांगलीच गोष्ट आहे. परंतु, त्याचा कधी अतिरेक होणार नाही याकडेही लक्ष दिलं पाहिजे. कारण, गुरुग्राममध्ये (gurugram) अशाच एका पाळीव श्वानामुळे (dog) दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी (owner beats neighbours) झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या भांडणामागील कारण अत्यंत किरकोळ असून अनेकांना हे कारण वाचून हसू येईल. (gurugram dog owner beats neighbours for calling pet dog kutta)

गुरुग्राममध्ये एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या पाळीव श्वानाला नावाऐवजी कुत्रा म्हटल्यामुळे या दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं आहे. शाब्दिक वादापासून सुरु झालेलं हे भांडण थेट मारामारीपर्यंत पोहोचलं. आपल्या श्वानाला नावाने न बोलावता कुत्रा म्हटल्यामुळे या व्यक्तीने (dog owner) चक्क ६ जणांना मारहाण केली आहे.

नेमकं का झालं भांडण?

'इंडिया टुडे'नुसार, गुरुग्राममधील सायबरसिटी येथील ज्योती पार्क भागात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये हा वाद झाला आहे. या भागात राहणाऱ्या सुधीर यांच्या शेजाऱ्यांकडे एक पाळीव श्वान असून तो आक्रमक असल्यामुळे त्याला चेनने बांधून ठेवा असा सल्ला सुधीर यांनी शेजाऱ्यांना दिला. मात्र, हा सल्ला देतांना त्यांनी श्नानाचा उल्लेख टॉमी करण्याऐवजी त्याला थेट कुत्रा म्हणून संबोधलं. ज्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. इतकंच नाही तर, या हाणामारीत सुधीर यांच्या घरातील ६ जण जखमी झाले असून त्यात लहान मुले व स्त्रियांचाही समावेश आहे.

टॉमी हा पाळीव श्वान असला तरीदेखील तो आमच्या मुलांच्या अंगावर धावून जातो आणि त्यांना चावण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला बांधून ठेवा असं मी सांगत होतो, असं सुधीर म्हणाले. तसंच त्यांनी गुरुग्राम पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रारदेखील दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT