Gyanvapi Case-Vyasji ka Tehkhana 
देश

Gyanvapi Case: वाराणसी कोर्टाने पूजेला परवानगी दिलेला 'व्यासजी का तहखाना' म्हणजे काय? ज्ञानवापीचा भाग की...

Gyanvapi Case: मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मसाजिद कमिटी (AIMC) विरुद्ध शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी दाखल केलेल्या दाव्याला उत्तर म्हणून न्यायालयाचा निर्णय आला. दरम्यान 'व्यासजी का तहखाना' काय आहे. ज्ञानवापी मशिद हे भाग आहे का हे आपण जाणून घेऊया.

Sandip Kapde

Gyanvapi Case: वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशीद संकुलातील दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला देण्यात आला आहे. याला 'व्यासजी का तहखाना', असे देखील म्हणतात.  न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

हे तळघर मशिदीच्या खाली आहे. आता येथे नियमित पूजा होणार आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे पूजा करण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने हा मोठा विजय असल्याचे म्हटले असून ३० वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर १९९३ पर्यंत येथे पूजा केली जात होती.  जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांच्या आत व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आल्याचे हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.

मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मसाजिद कमिटी (AIMC) विरुद्ध शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी दाखल केलेल्या दाव्याला उत्तर म्हणून न्यायालयाचा निर्णय आला. दरम्यान 'व्यासजी का तहखाना' काय आहे. ज्ञानवापी मशिद हे भाग आहे का हे आपण जाणून घेऊया.

व्यासजी का तहखाना म्हणजे काय?

मशिदीच्या तळघरात चार 'तहखाने' (तळखाने) आहेत त्यापैकी एक आजही येथे राहणाऱ्या व्यास कुटुंबाच्या ताब्यात आहे. शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मसाजिद कमिटीच्या विरोधात खटला दाखल करून जिल्हा दंडाधिकारी यांना तळघराचा रिसीव्हर म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली होती.

याचिकेत काय म्हटलं आहे -

याचिकेनुसार, पुजारी सोमनाथ व्यास १९९३ पर्यंत तेथे प्रार्थना करत होते. त्यानंतर तळघर बंध करण्यात आले.  सोमनाथ व्यास यांचा नातू असल्याने  तहखान्यात प्रवेश करून पूजा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी केली होती. मशीदीत येणारे लोक तळघरात भेट देत असतात आणि ते तळघर ताब्यात घेऊ शकतात, असा आरोप देखील व्यास यांनी केला होता. मात्र एआयएमसीचे वकील अखलाक अहमद यांनी हा आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT