corona vaccine sakal media
देश

'हर घर दस्तक' मोहिमेला सुरुवात; आता घरोघरी मिळणार लस!

PM मोदींचं प्रत्येक घरात लस पुरवण्याच्या सूचना

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतानं १०० कोटी डोसचा टप्पा पार केल्याच्या विक्रमी कामगिरीनंतर आता ही लसीकरण मोहिम अधिक व्यापक स्वरुपात राबवण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला लस मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) 'हर घर दस्तक' या मोहिमेला सुरुवात केली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी याची माहिती दिली.

मांडवीय यांनी ट्विट करुन सांगितलं की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या १०० कोटी डोस देऊन भारतानं ऐतिहासिक कामगिरी केल्यानं संपूर्ण जग भारताचं कौतुक करत आहे. मोदी सरकारनं प्रत्येक भारतीयाची सुरक्षेसाठी महत्वाची पावलं उचलली आहेत. त्याचअनुषंगानं हर घर दस्तक ही मोहिमही सुरु केली आहे. ही मोहिम आम्ही घरोघरी नेणार आहोत.

मोदींनी काय म्हटलं?

G20 शिखर संमेलन आणि COP26 या परिषदांमध्ये भाग घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाले, आजवर आपण सर्वांनी लोकांना लसीकरण केंद्रांवर पोहोचवण्यासाठी आणि सुरक्षित लसीकरणासाठी व्यवस्थापन केलं. आता प्रत्येक घरी लस, घरोघरी लस या ध्येयानं आपल्याला आता प्रत्येक घरी पोहोचायचं आहे. मोदी म्हणाले, प्रत्येक घर ठोठावताना पहिल्या डोसनंतर आपल्याला दुसऱ्या डोसकडेही तितकचं लक्ष द्यावं लागेल. कारण जेव्हा संसर्गाचं प्रमाण कमी होताना दिसतं तेव्हा दुसरा डोस वेळेत घेण्याची भावना कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT