सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  esakal
देश

कुत्र्याला त्रास देणे पडले महागात, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाऴ वृत्तसेवा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर नेहमी कोणता कोणता व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तसाच एक आणखीन व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला कुत्र्याला त्रास देणे महागात पडले आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. मात्र, असे कृत्य कोणत्याही जीवाशी करू नये.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरील कुत्र्याला पकडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे पाहून काही लोक रस्त्याच्या कडेला उभे राहिलेले दिसत आहे. त्याच वेळी, गर्दी पाहून ती व्यक्ती अस्वस्थ होते. यानंतर त्या व्यक्तीने कुत्र्याचे दोन्ही कान पकडून त्याला फिरण्यास सुरुवात केली. त्यावेळी कुत्रा पळून जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता.

असे असूनही कुत्रा व्यक्तीच्या तावडीतून सुटू शकला नाही. हे पाहून कुत्रा असहाय्यपणे रडू लागतो. लोकांना हसताना पाहून ती व्यक्ती हसायला लागते. यानंतर ती व्यक्ती कुत्र्याचे कान पकडून त्याला जोरात फिरवू लागली. त्याचवेळी कुत्रा ओरडत असलेला दिसून आला.

मग एका गायीची नजर त्या व्यक्तीवर पडली आणि त्या व्यक्तीची हालचाल पाहून ती खूप दुःखी झाली. त्यावेळी गाय त्या व्यक्तीला धडा शिकवायचे ठरवते आणि मग गाय धावत येऊन त्या व्यक्तीला जोरात मारली. यामुळे ती व्यक्ती दूर उडली, हे पाहून सगळे हसू लागतात. त्याच वेळी ती व्यक्ती जमिनीवर पडून राहिल्याचे पाहावयास मिळत आहे. व्हिडिओ पाहता त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर लोक या व्यक्तीच्या वागणुकीवर टीका करत आहेत.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ 1 लाख 44 वेळा पाहिला गेला असून 15 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याच वेळी, 3 हजारांहून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. तर शेकडो लोकांनी कमेंट करून गायीचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT