Mayawati esakal
देश

BSP chief Mayawati : दलितांनो.. काँग्रेस-भाजपला नको, 'बसप'ला एकगठ्ठा मतदान करा; मायावतींचे आवाहन

Haryana Assembly Elections Mayawati : मायावती यांनी जम्मू-काश्‍मीरमधील दलितांनादेखील काँग्रेस आणि भाजपऐवजी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

''काँग्रसचे नेते हे आरक्षण विरोधी आहेतच, मात्र आता तर ते, ‘योग्य वेळ आल्यावर आरक्षण संपवू’ असे म्हणत आहेत.''

लखनौ : ‘‘हरियानामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानदेखील काँग्रेसकडून सातत्याने दलितांची उपेक्षा आणि त्यांचा तिरस्कार केला जात आहे. याचा अर्थ काँग्रेसमध्ये (Congress) सर्वकाही आलबेल नाही हे यावरून सिद्ध होते. पक्षात आताच जर ही परिस्थिती आहे, तर पुढे काय होईल त्यामुळे दलितांनी काँग्रेस किंवा भाजपसारख्या पक्षांना मतदान करू नये,’’ असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी रविवारी केले आहे.

त्यांनी एक्स या समाजमाध्यमावरून काँग्रेस आणि भाजप (BJP) दोघांवरही टीका केली आहे. ‘‘काँग्रसचे नेते हे आरक्षण विरोधी आहेतच, मात्र आता तर ते, ‘योग्य वेळ आल्यावर आरक्षण संपवू’ असे म्हणत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दलितांना बहुजन समाज पक्षाला एकगठ्ठा मतदान करावे, कारण आमचा पक्ष एकमेव आहे जो कायमच दलितांच्या हिताचा आणि त्यांना त्यांचे घटनात्मक हक्क मिळावेत यासाठी कार्यरत आहे.’’ असे मायावती म्हणाल्या.

जम्मू-काश्‍मीरमध्येही दलितांना आवाहन

मायावती यांनी जम्मू-काश्‍मीरमधील दलितांनादेखील काँग्रेस आणि भाजपऐवजी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘‘काँग्रेस आणि भाजपच्या खोट्या आश्‍वासनांना अजिबात बळी पडू नका. त्यांचा इतिहास हा दलितविरोधी आहे,’’ असे मायावती यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT