Supreme Court Eknath Shinde Sakal
देश

Hate Speech Case : महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही - सर्वोच्च न्यायालय

राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही राज्यातल्या हिंदू संघटनांकडून होणाऱ्या, भावना भडकवणाऱ्या भाषणांवर राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकलं नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याने सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने सरकार षंढ असल्याची टीका करत सुनावलंही आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांच्या मुद्द्यावरुन आज सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुंबईतल्या हिंदू जन आक्रोश रॅलीविरोधातली एक सुनावणी आज पार पडली. यावेळी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही, त्यामुळंच हे सगळं काही होत आहे, अशा भाषेत सुनावलं आहे.

ज्यावेळी राजकारण आणि धर्म वेगळे होतील, तेव्हा हे सगळं थांबेल. राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, असंही न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले आहेत.

न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, तेढ निर्माण करणारी भाषा एक दुष्टचक्र आहे. यावर लोक प्रतिक्रिया देणारच. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. कायदा तुम्हाला धर्मासंबंधी मोर्चा काढण्याची परवानगी देतो. पण कायदा तोडण्याची परवानगी देत नाही.

अशा मोर्चांमधून अल्पसंख्याक समाजाला कमीपणा दाखवणारी वक्तव्यं केली जात आहे, त्यांना पाकिस्तानला जाण्यास सांगितलं जात आहे, अशी चिंताही न्यायालयाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT