Hathras stampede Esakal
देश

Hathras Stampede: 'त्यामुळे लोक बेशुद्ध होत गेले अन् गुदमरून मृत्यूमुखी पडले...', भोले बाबाच्या वकिलाचा नवा दावा

Bhole Baba: सत्संगाच्या वेळी 10 ते 15 अज्ञात लोकांनी कंबरेला विषारी मादक स्प्रे बांधून लोकांवर फवारल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे लोक बेशुद्ध होत गेले आणि गुदमरून मृत्यूमुखी पडले.

आशुतोष मसगौंडे

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. नारायण हरी साकार उर्फ ​​भोले बाबा उर्फ ​​सूरजपाल याचे वकील एपी सिंह यांनी दावा केला आहे की काही भाविकांनी विषारी स्प्रे फवारलला होता. त्यामुळे तिथे लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

हाथरस घटनेच्या माध्यमातून नारायण हरी यांच्या सत्संगाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांनी सांगितले. सत्संगाच्या वेळी 10 ते 15 अज्ञात लोकांनी कंबरेला विषारी मादक स्प्रे बांधून लोकांवर फवारल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे लोक बेशुद्ध होत गेले आणि गुदमरून मृत्यूमुखी पडले.

एपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडालपासून काही अंतरावर एक अनोळखी पांढरी आणि एक काळी स्कॉर्पिओ उभी होती. घटनेनंतर फवारणी करणारे लोक पळून गेले. हे 3-4 जणांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व लोक त्या दिवशी घटनास्थळी हजर होते. एसआयटी आणि प्रशासनासमोर या लोकांचे जबाबही नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पोलीस आणि प्रशासनाने परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रशासनाला नकाशाही देण्यात आला होता, त्या आधारे परवानगी देण्यात आली. त्या दिवसाच्या टोलपर्यंत जवळचे सीसीटीव्ही द्यावे अशी मागणी वकील एपी सिंह यांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT