Russia Ukraine War  Sakal
देश

Ukraine मधून विद्यार्थ्यी परतले, पण शिक्षणाचं काय? आरोग्य मंत्रालय म्हणतंय...

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन आठ दिवस अलटून गेले आहेत.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासाबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. हा एक कठीण काळ असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. युक्रेनमधून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यास कसा होईल आणि सरकार याबाबत काही नियोजन करत आहे का, या प्रश्नाना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. (Health Ministry on Student Returning From Ukraine )

ते म्हणाले की, आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात काम करत असून, देशात परतल्यावर विद्यार्थ्यांसाठी नियम शिथिल करण्यात आले. भविष्यातही परिस्थितीनुसार त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. परिस्थिती चिंताजनक आहे हे समजून घेतले पाहिजे. संबंधित विभाग त्यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. युक्रेनवर रशियन सैन्याच्या युद्धामुळे शेकडो भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

18,000 हजार भारतीय परतले

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्द सुरू झाल्यानंतर भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या अॅडव्हायझनंतर एकूण 18,000 भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात परतले आहेत. तसेच ऑपरेशन गंगा अंतर्गत, युक्रेनमधून 6,400 भारतीयांना घेऊन आतापर्यंत 30 उड्डाणे भारतात पोहोचली असून, पुढील 24 तासांत आणखी 18 विमाने नियोजित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire : लोक जळत होते, खिडकी फोडली अन् पाईपच्या साहाय्याने खाली उतरली... लखनऊ आगीतील युवतीची वेदनादायक कहाणी

Arabian Sea Monsoon : मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Lalan Singh: सहारनपूरच्या जंगलात मध्यरात्री सुरू झाला गोळीबार... पोलिसांनी ओळखला तोच कुख्यात ललन सिंह; काही मिनिटांत संपली वर्षांची दहशत

Latest Marathi News Live Update : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ढगफुटीसदृश पाऊस; शिऊर बंगला-नांदगाव मार्गावरील पूल गेला वाहून

Ahilyanagar Crime: मित्रा कशाला वाद घालतो, भांडणात मध्यस्थीला गेला; ३२ वर्षीय तरुणाला १६ वर्षांच्या मुलानं संपवलं

SCROLL FOR NEXT